Share

“नाव सार्थकी लागले… मविआ-मद्य विक्री आघाडी”, सदाभाऊंचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी पक्षातील नेतेही विरोधकांना तिखट शब्दात प्रत्युत्तर देत आहेत. आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. ‘नाव सार्थकी लागले… मविआ-मद्य विक्री आघाडी’ असा खोचक टोला सदाभाऊंनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात वाईन किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्समध्ये विक्री करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधत त्याबाबतची माहिती दिली.

महाराष्ट्रात अनेक वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!