🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात अधिकाधिक नागरिकांना ऐकता यावी यासाठी राज्यातील सर्व भाजपच्या बुथ आणि शक्ती केंद्रावर एकत्र ऐकण्याची व्यवस्था करणार आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil)कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 30, 2022
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधून पंतप्रधान त्यांच्या मनाला भावनाऱ्या गोष्टी सांगतात, आणि त्यातून आम्हालाही अशी प्रेरणा मिळते की आपणही असे केले पाहिजे. मन की बात देशवासीयांना अधिकाधिक ठिकाणी एकत्र येऊन ऐकता यावी यासाठी राज्यातील २९ हजार शक्ती केंद्रावर एकत्र पाहण्याची व्यवस्था येत्या मार्च महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. याप्रश्नी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य केले असून त्यांच्याविरोधात अवमानकारक याचिका दाखल करणार असल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
-
“२०१४ साली ज्यांनी युती तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार का?”
-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; कोविड न्यूमोनियाचे झाले होते निदान
-
“मुख्य सचिवानेच पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली, मुख्यमंत्री उत्तर देणार काय?” बावनकुळेंचा सवाल
-
“आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
-
“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…”, अमृता फडणवीसांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
