🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.
देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत माजी खेळाडू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. तसंच ‘गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य’ असल्याचंही त्यांनी अधोरेकित केलं आहे.
While the nation is in the midst of second wave of COVID-19, it becomes our responsibility to come together and assist the people in need. Taking inspiration from the same, Cricket Academy of Pathans (CAP) is going to provide free meals to COVID-19 affected people in South Delhi. pic.twitter.com/8Binh0HH2h
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 5, 2021
राजधानी नवी दिल्लीत कोरोना लाटेचा दुसरा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. दिल्लीत दररोज नव्या कोरोनाग्रस्तांची लक्षणीय भर पडत आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसंच रुग्णांनाही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. इरफान पठाण याने सांगितलं की, आमची अकादमी दक्षिण दिल्लीतील कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन पुरवेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
