🕒 1 min read
पुणे : एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये विरोधकांना अद्दल घडविण्याची भाषा केली होती. गृहमंत्रालयाचा हिसका दाखवा, असे आवाहनच शरद पवारांना एकनाथ खडसे यांनी केलं होतं. यावर गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं असा थेट घणाघात गिरीश महाजनांनी केला आहे.
“ग्रामपंचायतमध्ये पडेल. नगरपालिकेत आमचा महापौर आहे. मुलगी विधानसभेला उभी राहिली आणि पडली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का?” असा खोचक सवाल महाजनांनी केला आहे.
तसेच खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्याचं भाषण मी ऐकलं त्यामध्ये ते म्हणाले ‘दोन चार माणसांना जेलमध्ये टाका’ असं एखादा विक्षिप्त माणूसच करू शकतो, असेही महाजन म्हणाले.
खडसेंची नेमकी टीका काय ?
एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. एकनाथ खडसेंनी राज्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप भाजपवर केला होता. तसेच यासह यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सल्लाही त्यांनी दिला होता.
वळसे पाटलांना अनेकदा मी सांगतो की, गृहमंत्रीपद जे आहे त्याचा एकदा हिसका दाखवा, एकदा इंगा दाखवा, असेही वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
