Share

IPL 2022 : CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनाला झालाय आनंद? गुजरातच्या कॅप्टनला काय म्हणाला एकदा पाहाच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनाने (suresh raina) राशिद खानच्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. IPL 2022 चा २९ वा सामना रविवारी गुजरात (GT) आणि चेन्नई (CSK) यांच्यात खेळला गेला. कर्णधार हार्दिकच्या अनुपस्थितीत लेगस्पिनर राशिद खानकडे (rashid khan) कर्णधारपद सोपवण्यात आले होते. ज्याने पर्दापणातच कर्णधारपदाची छाप सोडली. दुसरीकडे सुरेश रैनाने ट्विट करत राशिद खानच्या कर्णधारपदाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत कर्णधार राशिद खानने २१ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी डेव्हिड मिलरने नाबाद ९४ धावांची खेळी खेळली. या दोन फलंदाजांच्या जोरावर गुजरात टायटन्सने या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला. सुरेश रैनाची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने रशीद खानचे कौतुक करणारे ट्विट केले.

सुरेश रैनाने (Suresh raina) ट्विट करत लिहिले, “काय मॅच होती. या क्लोज मॅचने आयपीएलला जीवदान दिले आहे. कर्णधार म्हणून पदार्पण केल्याबद्दल रशिदचे (rashid khan) अभिनंदन आणि डेव्हिड मिलरने मैदानाभर चेंडू भिरकावले” रैनाने CSKच्या पराभवानंतर केलेल्या या ट्विटने नवीन चर्चाना उधाण आले आहे. चेन्नईच्या ‘चिन्ना थाला’ आता त्यांच्या पराभवाने आनंदित आहे असे चाहत्यांना वाटू लागले आहे.

चेन्नईने यंदा कामगिरीने चाहत्यांची निराशा केली आहे. चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेत पाचव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी, चेन्नईने सलग चार सामने गमावले आहेत. चेन्नई गुणांसह गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!