🕒 1 min read
मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राज ठाकरेंच्या वक्तव्यांनंतर सध्या राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मनसे आणि भाजपावर चांगलाच हल्लाबोल होत आहे. “तुम्हाला भाषण करायचे आहे तर तुम्ही जरूर करा पण आम्हाला काम करू द्या” अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाषण करून तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, आपली फक्त बदनामी होईल. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही. मराठी-मराठी करता तर खरंच मराठीबाबत एवढं प्रेम असेल, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका”.
तसेच नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

