Share

IPL 2022 KKR vs RR : दोघांमध्ये कोणाचं पारडं जड? रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ मारू शकतो बाजी!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ३० वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना जबरदस्त रंगण्याची अपेक्षा आहे.

आयपीएलच्या १५ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत पाच सामन्यांत तीन सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सने सहा सामन्यांत तीन सामने जिंकले आहेत. वरच्या फळीतील फलंदाजी हा केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे. व्यंकटेश अय्यर यावेळी विशेष काही करू शकलेला नाहीत. गोलंदाजीत राजस्थान रॉयल्सने डेथ ओव्हर्समध्ये खूप धावा खर्च केल्या आहेत. त्यांना ही समस्या दूर करावी. मात्र, चहलने प्रभावी गोलंदाजी केली आहे. पॅट कमिन्स आणि सुनील नरिन यांच्याशिवाय केकेआरकडे गोलंदाजीत आंद्रे रसेलही आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आतापर्यंत २५ सामने झाले आहेत, त्यापैकी केकेआरने १३ वेळा आणि राजस्थान रॉयल्सने ११ वेळा विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ३००० हून अधिक धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६००हून अधिक धावा केल्या. मात्र, या आयपीएल हंगामात तो केकेआर संघाचा भाग नाही. गोलंदाजीत सुनील नरिनने केकेआरसाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खूप यश मिळवले आहे. त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!