नवी दिल्ली : भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावला आहे. सध्या ते देशातील जनतेला संबोधित करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह होत आहे. त्यामुळे मोजक्या मान्यवरांची उपस्थिती आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनी देशवासियांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Greetings to you all on Independence Day.
आप सभी को 75वें स्वतंत्रता दिवस की बहुत-बहुत बधाई। आजादी के अमृत महोत्सव का यह वर्ष देशवासियों में नई ऊर्जा और नवचेतना का संचार करे।
जय हिंद! #IndiaIndependenceDay
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2021
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासहित टोक्यो ऑलिम्पिकमधील ३२ खेळाडूंना स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर निमंत्रित करण्यात आलं आहे. जवळपास २४० ऑलिम्पियन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा सपोर्ट स्टाफ आणि स्पोर्ट्स फेडरेशनचे अधिकारी उपस्थित आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्यदिन ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी मोदींनी आवाहन केलं होतं. भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू केला होता, जो १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड प्रकरणात खर-खोटे समजण्यासाठी व्हाइट पेपर काढा’ ; मुनगंटीवारांची मागणी
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
- ‘पुलवामासारखे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी भारतीयांची लस फुकट दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

