मुंबई : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. पोस्टाने तक्रार करून काही कारवाई झाली नसल्याने त्या महिलेने काही वेळापूर्वी थेट पोलीस ठाणे गाठले आहे. दरम्यान आता यावर आता भाजपचे नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भाष्य केले आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरील तक्रार खरी की खोटी आहे याची चौकशी व्हावी. वेगाने चौकशी व्हावी काय खरं काय खोटं ते पुढं आलं पाहिजे. काय खर काय खोटं याबाबत व्हाइट पेपर काढला पाहिजे. लोकांच्या मनात शंका ठेऊ नये. एसआयटी चौकशी होईल याबाबत पूर्वीच मत व्यक्त करणे योग्य नाही,’ असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
- ‘पुलवामासारखे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी भारतीयांची लस फुकट दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

