मुंबई : गेल्या वर्षी पासून कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे, कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर मोठा परिणाम झाला असून प्रवेश प्रक्रियांबाबत देखील मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेताच अंर्तगत मूल्यमापन व आधीच्या वर्गातील गुण यांच्या आधारावर दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
अकरावीच्या प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा घेण्याचे राज्य सरकारने ठरवले होते. मात्र एका विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षांचा निर्णय रद्द केला. यानंतर अकरावी प्रवेशांबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.
फेऱ्यांचे नियोजन कसे ?
पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हिंदुहृदयसम्राट तर गडकरींचा उल्लेख रोडकरी करत’; शिवसेना खासदाराने करून दिली ‘ती’ आठवण
- ‘प्रकाश आंबेडकर सोबत आले, तरच रिपब्लिकन ऐक्य शक्य’, रामदास आठवलेंची भूमिका
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- संजय राठोडांच्या अडचणीत होणार वाढ; ‘त्या’ महिलेने गाठले पोलीस ठाणे
- तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

