Share

मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी

Published On: 

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दर, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.

काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी विषम स्थिती निर्माण झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमी झाला आहे. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. हवामान खात्याकडून आजपासून राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर आज राज्यात पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित पाच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30-40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या मात्र राज्यात पुन्हा पावसाची उघडीप असणार आहेत. त्यानंतर सलग तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!