Share

दारूबंदी : ‘जे मुख्यमंत्री जिजाऊंचे नाव घेणारे आहेत त्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती’

Published On: 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, भाजप सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

चंद्रपूर जिल्ह्यात २०१० पासून दारूबंदीचे आंदोलन सुरु केलेल्या श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. परोमिता गोस्वामी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाने अतिशय निराश झाल्या आहेत. ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘या निर्णयाने मला आज अतिशय वाईट वाटत आहे. ज्या पद्धतीने सरकारने महामारीच्या काळात ही बंदी उठवली आणि दारू ही काय जीवनावश्यक वस्तू नाहीये. आज लोकांच्या हाताला काम नाही, खायला मिळत नाही, रोज लोक मरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मृत्युदर कमी कसा करता येईल ? लोकांना मृत्यू पासून कसे वाचवता येईल अशी अपेक्षा सरकारकडून होती मात्र झालं वेगळच’. असे परोमिता गोस्वामी म्हणाल्या आहेत.

तर, ‘किमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तरी असा निर्णय घेण्याची अपेक्षा नव्हती. एक पालकमंत्री म्हणजे काय सर्वेसर्वा नसतो. जे मुख्यमंत्री इतके संवेदनशील आहेत, छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंचे नाव घेणारे आहेत. त्यांच्याकडून तरी संवेदनशीलता महिलांच्याप्रती संवेदनेची अपेक्षा होती. किमान महामारी मध्ये तरी असा विचित्र निर्णय घेणार नाहीत’. अशी थेट नाराजी परोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!