जालना – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस शिवाजी नारियलवाले यांना तत्कालीन डिएसपी सुधीर खिरडकर यांच्या समक्ष पोलीस निरीक्षकासह काही पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय. तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी देखील या युवकास मारहाण केल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
७ एप्रिल रोजी जालना शहरातील एका जिम चालकाचा अपघात झाला होता. त्यास गंभीर जखमी अवस्थेत जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संतप्त मित्रांनी रुग्णालयात तोडफोड केली होती. याच वेळी पोलीस तेथे आल्याने रुग्णालयात तोडफोड करणारे तरुण फरार झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले पोलिसांच्या तावडीत सापडले.
त्यावेळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेऊन बेदम मारहाण केली. शिवराज यांनी गयावया करीत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पाय देखील धरले. परंतु पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी अंगावर काठी तुटेपर्यंत या युवा कार्यकर्त्यास बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपनेत्या चित्रा वाघ या सर्व प्रकारानंतर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. चार-चारजण मिळून लाथाबुक्के दांडुक्याने एकाला हॉस्पिटल मध्ये मारताहेत… कोरोनामहामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत लोकांचे खुन होताहेत तिथे दाखवा खाकीचा ज़ोर…गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.सोबतच त्यांनी संबंधित पोलिसांवर त्वरीत कारवाई व्हावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालक यांना केली आहे.
https://twitter.com/BJYM4MH/status/1397818944518430722?s=20
भाजप युवा मोर्चाची प्रतिक्रिया
भाजप युवा मोर्चाने याबाबत ट्विट केले आहे की, जालना पोलिसांची भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्याला जाणूनबुजून निर्दयी मारहाण करण्यात आली आहे. लाज वाटली पाहिजे यांना. तेथील पोलिस उपअधीक्षकांनी गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने या कार्यकर्त्याने ते व्हिडियो शूट केले. त्याचा राग मनात ठेऊन जनावराप्रमाणे मारहाण करण्यात आली.असा आरोप जालना पोलिसांवर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सामान्य युवकाचा संभाजीराजेंनी केला थाटात वाढदिवस साजरा
- राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये – कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

