Share

जालन्यात लसी उपलब्ध; मात्र ऑनलाईन नोंदणी असेल तरच मिळणार लस

Published On: 

🕒 1 min read

जालना: जिल्ह्यात लस उपलब्ध झाली असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, ऑनलाईन नोंदणी नसेल तर लस दिली जाणार नाही तसेच इतर जिल्ह्यातील नागरिकांना लस दिली जाणार नसून येथील स्थानिक नागरिकांनाच आधी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांन दिली आहे. जिल्ह्यात कोविशिल्डच्या १४ हजार २०० तर कोव्हॅक्सिनचे १ हजार ८०० डोस गुरुवारी मिळाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांना व जालना शहरातील पाणीवेस, रामनगर व नूतन वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोविशील्डचे वाटप करण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील पहिल्या व दुसऱ्या डोससाठी ही लस असेल. तसेच दुसऱ्या डोसचे अंतर ८४ दिवसांचे आहे. त्यामुळे कोविन पोर्टलप्रमाणे ज्याचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर येईल, त्यांनीच लसीकरण केंद्रावर यावे. कोव्हॅक्सिनचे १ हजार ८०० डोस ग्रामीण रुग्णालय भोकरदन, घनसावंगी, मंठा, परतूर, उपजिल्हा रुग्णालय अंबड व जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे वाटप करण्यात आले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये.

लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही किंवा त्रास होणार नाही असे नाही त्यामुळे लस घेतल्यानंतर लाभार्थींनी मास्कचा नियमित वापर करणे, सॅनिटायझर नियमित वापरणे, हात नियमित धुण्यात यावे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर फिजिकला डिस्टन्सचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!