Share

‘राधे’ सिनेमातील भूमिकेमुळे नाराज असलेलल्या चाहत्यांना प्रविण तरडे यांनी दिले ‘हे ‘उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  प्रवीण तरडेंनी मराठी सिनेसृष्टी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. प्रविण तरडेंच्या सिनेमांना प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळते. ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘देऊळ बंद’ यासारख्या चित्रपटातून त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून ते माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. नुकत्याच रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘राधे- युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ या सिनेमात प्रविण तरडेंनी ‘दगडू दादा’ एका गुंडाची अत्यंत छोटी भूमिका साकारली होती.

प्रविण तरडेंच्या ‘राधे’ सिनेमातील भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचा खुलासा स्वत: प्रविण तरडेंनी केलाय. सुपरस्टार सलमान खानसोबत नातं निर्माण करण्याची ही छोटी भूमिका स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. प्रविण तरडे यांच्या सिनेमातील भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचं ते म्हणाले. एवढी लहान भूमिका त्यांनी का स्विकारली असा प्रश्न चाहते विचारत असल्याचं तरडे म्हणाले. ” भूमिका किती मोठी आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला सलमान भाईसोबत नात निर्माण करायचं  होतं आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.” असं ते म्हणाले.

प्रविण तरडेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी सिनेमाचा लवकरच हिंदी रिमेक येणार आहे. ‘अंतिम’ या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर ‘अंतिम’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘हिंदी सिनेसृष्टी आपला विषय जगासमोर मांडतेय हा खूप मोठा सन्मान आहे’. असं म्हणत तरडे यांनी आनंद व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!