Share

पालक म्हणतात दहावी-बारावीचे परिक्षा शुल्क परत करा, मंडळ म्हणते खर्च जास्त देणे कठिण!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून परीक्षेसाठी भरलेली फी परत परत करण्याची मागणी पालक संघटनांकडून होत आहे. प्रत्यक्ष परीक्षेचे शुल्क परत करणे अवघड असून परीक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यामुळे शुल्क परत देणे शक्य नसल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने रद्द केल्या आहे. त्यानंतर नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षा न झाल्यामुळे शुल्क परत करावे अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे. दहावीसाठी ४१५ तर बारावीसाठी ४३० शुल्क घेण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी एक लाख ४६ हजार ४१० दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८३ हजार ६११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

या विद्यार्थ्यांचे एकूण २७ कोटी ८८ लाख ६७ हजार ७४५ रुपये मंडळाकडे जमा झाले आहे. सीबीसी धर्तीवर राज्य मंडळाने देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा रद्द केली असली तरी मंडळाकडून परीक्षा तयारीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने राज्य मंडळाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती. त्यानुसार प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका कशी खरेदी छपाई करण्यात आली होती. संबंधित शाळा महाविद्यालयात परीक्षा घेण्यासाठीचे साहित्य पाठविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क परत करणे अशक्‍य असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!