Share

अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेत्या बाप-लेकीचा मृत्यू, तर मामा गंभीर जखमी

Published On: 

औरंगाबाद : खुलताबाद पर्यटन स्थळी फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या, बाप लेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत, रविवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान मृत्यू झाला. यात एक जन गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी येथे उपचार सुरु आहे. मोनिका गणेश रीनवाल वय २३, ज्ञानेश्वर दामोदर परदेशी वय ४०, दोघे राहणार जाधववाडी असे मयत बाप लेकीचे नाव असून बद्री साईदास जाधव वय ४५, रा. पडेगाव हे गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत ज्ञानेश्वर परदेशी हे पर्यटनस्थळी परिवारासह फुगे विक्रीचा व्यवसाय उदरनिर्वाह करण्यासाठी करत होते. रविवारी चांगला व्यवसाय होईल या आशेने ज्ञानेश्वर, मोनिका आणि बद्री हे खुलताबाद जवळील पर्यटन स्थळी गेले. सकाळी साडे आकराच्या दरम्यान औरंगाबाद कडे परत येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरात होती कि, ज्ञानेश्वर, मोनिका हे दोघे बाप लेक जागीच गत प्राण झाले. तसेच बद्री हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे हे कर्मचाऱ्यांसोबत तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी सर्वाना घाटी दवाखान्यात पाठवले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!