Share

…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. दरम्यान, आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी अनेकवेळा समोर आली आहे.

आता एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ‘मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत.’ असं विधान नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये केलं आहे.

नाना पटोलेंची मुख्यमंत्री होण्याची तयारी !

नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष असल्याचं समोर आलंय. याबाबत एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी काँग्रेसचा सरळ प्रचार करावा, असं आवाहन त्यांनी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेलला दिलेल्या भेटीला केलं आहे. ‘कसं वाजवायचं हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही पाहिलं मला विधानसभेत. म्हणून तुम्हाला सांगतो सगळेजण एकजुटीने रहा. मुरलीधर राऊत तुम्ही खूप समाजसेवा केली. आता तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा सरळ. नानाभाऊंना मुख्यमंत्री बनवायचं आहे महाराष्ट्राचं,’ असं विधान स्वतः नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!