Share

‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’ ; कपिल सिब्बल यांचा दावा

Published On: 

दिल्ली : २०२२ साली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप मध्ये इनकमिंग जोरात सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली.

यानंतर काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाची वाटचाल आणि अन्य गोष्टींबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून पक्षांतर्गत अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले आहे.

आताच्या घडीला देशात भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय नाही, याची कबुली देत सिब्बल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कार्यभार हाकण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. भाजपसमोर काँग्रेसच एक उत्तम पर्याय म्हणून उभे राहू शकते, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. तसेच देशाला मजबूत, विश्वासार्ह विरोधी पक्षाची आवश्यकता आहे.

काँग्रेस पक्षाने आपली सक्रीयता ही दाखवून देण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाला संघटनात्मक निवडणुका घेण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर व्यापक सुधारणा घडवण्याचीही आवश्यकता आहे. याशिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि युवा नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्याची गरज आहे, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले आहे. दरम्यान आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ मधील शानदार विजयानंतर आता तृणमूल काँग्रेसची नजर उत्तर प्रदेशाकडे वळलीय. बंगालमधील विजयानंतर तृणमूलच्या आत्मविश्वासातही वाढ झालीय.

त्यामुळे राज्याबाहेरही पक्षाच्या विस्तारासाठी पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे, करोना संक्रमणकाळात आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अडचणींत वाढ होण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!