Share

घरी परतणाऱ्या पादचारी वयोवृद्ध हॉटेल कामगाराचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सैय्यद रफिक सैय्यद करीम (वय ५५,रा.मोमीनपुरा,दौलताबाद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ११ जून रोजी रात्री ८ वाजता दौलताबाद रोडवरील मेट्रो हॉटेलजवळ घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सय्यद रफिक हे हॉटेल पिकनिक येथे वेटर म्हणून काम करतात, दि. ११ रोजी नित्य प्रमाणे ते कामाला गेले होते. त्याच दिवशी रात्री घरी पाहुणे आल्यामुळे, तसेच त्यांना मोबाईल वापरता येत नसल्यामुळे, त्यांना त्यांचा भाचा हॉटेल पिकनिक येथे बोलवण्यासाठी गेला. त्यानंतर दोघे घराच्या दिशेने पायी येत असताना. दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफव्ही-०१८१) च्या चालकाने सय्यद रफिक यांना मागून जोराची धडक दिली.

यात सय्यद रफिक हे गंभीर जखमी झाले. हि माहिती त्यांच्या भाच्याने घरच्यांना कॉल लावत कळवली. त्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफव्ही-०१८१) च्या चालकाविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!