Share

पुण्यात उद्यापासून आणखी नियम शिथिल होणार; जाणून घ्या आज किती सक्रिय रुग्ण ?

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

पुणे शहरात आज नव्याने २४२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७४ हजार ११२ इतकी झाली आहे. शहरातील ३८८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६२ हजार ६१० झाली आहे.

दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या(ऍक्टिव्ह रुग्ण) ३ हजार २७ रुग्णांपैकी ५११ रुग्ण गंभीर तर ८२२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ४७५ इतकी झाली आहे.

उद्या पासून नियम आणखी शिथिल !

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. तसेच, हॉटेल्स आसनक्षमतेच्या ५० टक्के वापरासह रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तर, नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!