🕒 1 min read
परभणी : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार कन्हैया सरोदे यांचा मृत्यू झाला. तर पोलिस शिपाई आशा मुसळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मध्यवस्तीतील पोलिस मुख्यालयासमोर गुरूवारी सांयकाळी सव्वा पाच वाजता पेट्रोलपंपाच्या बाजुला असलेल्या रस्त्याने सरोदे हे मुख्खालयातून बाहेर येत होते. त्याच वेळी आशा मुसळे या दुचाकीने मुख्यालयाकडे जात होत्या. त्याच क्षणी एका पांढऱ्या रंगाच्या आयटेन कारने या दोघांना जोरदार धडक दिली. त्यात सरोदे यांचा डोक्यास जोराचा मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात मुसळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सुनिल ओव्हळ आदीनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस या प्रकरणात संबंधित कारसह कारचालकाचा तपास करीत आहेत. आता सामान्य नागरिकांसह पोलिस अधिकारी देखील अपघाताच्या सत्रापासून वाचू शकत नाहीत. तसेच भरधाव येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- थर्ड अंपायर कडून आणखी एक मोठी चूक; भारतीय संघाला भोगावे लागू शकतात वाईट परिणाम !
- इन फॉर्म ईशान किशनला संघातून डावलल्याने चाहत्यांमध्ये नाराजी; कारण आले समोर
- “वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, आता त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या”
- खळबळ! डी-मार्टचे सहा कर्मचारी पॉझिटिव्ह, मॉल पाच दिवसांसाठी सील
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
