Share

‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटाला परमवीर सिंगच जबाबदार’ ; मुश्रीफांचा आरोप

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे व्हायरल झाली आहेत. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय. चौकशी अहवालातून दूध का दूध पानी का पानी झालंय, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे.

तसेच मुश्रीफ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटाला परमवीर सिंगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला. तर अनिल देशमुख निर्दोष आहेत, पक्षाला बदनाम करण्याच हे भाजपचं कारस्थान आहे असं मी वारंवार सांगत होतो. सीबीआयच्या अहवालाने याचा पर्दाफाश केलाय, असं मुश्रीफ म्हणाले. तसेच चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून देशमुख यांच्यावर अन्याय केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

तर देशामध्ये फेकन्यूज हे व्हायरस सारखे पसरत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले आहे. सत्य समोर आणण्याची जनतेची, माध्यमांची आणि जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. हा अहवाल खरा की खोटा हे सीबीआयसोडून कुणीही सांगू शकत नाही. सीबीआयने याबाबतील खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!