सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील भाजपा-शिवसेना कार्यकर्ते समोरा-समोर आल्याचे चित्र बघायला मिळाले. फक्त एवढेच नाही तर शिवसेनेकडून रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते. तसेच राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली, परंतु त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली असून ते पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधात टीकास्त्रांचा प्रहार करतांना दिसून येत आहे.
आज माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली, ती शैली तो आवेष आता पाहायला मिळणार नाही. कुणीही आव आणू नका. काहीजण नाकात बोलतात, भाषा शैली नाही म्हणजे अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत. नुसतं आडनाव लावलं म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. तशी गुणात्मक कृती दिसली पाहिजे, तर ती ठाकरे भाषा.’ असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
तसेच, ठाकरेंच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनीच रेकॉर्ड केलेली कॅसेट मलाही मिळते. मला लांब जायची गरज नाही. कुठे खासगीत बोलले तरी मला कळते. त्यामुळे सर्व व्यवस्था अगोदरच लावलेली आहे, पाहू आता. असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, ‘ठाकरे भाषा विधायक सामाजिक दृष्टिकोनातून राज्याच्या हिताच्या दृष्टिने असेल तर समजू शकतो. मी स्वागत करेन. आकसाने, सूडबुद्धीने अशाच कारवाया करत राहीले. तर जशाच तसे उत्तर देणे हे आमचे काम आहे. मी मुद्दाम कोणाची कळ काढायला जाणार नाही, मला विनाकारण डिवचण्याचे काम कुणी करू नये. असे देखील राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांना अज्ञाणी म्हणत राणेंचा जाहीर इशारा, ‘अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही!’
- ‘वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्याने जीव दिला, अन् अनिल परब नसते उद्योग करतोय’, निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?..,’ संजय राऊतांनी राणेपुत्रांना शब्दांनी झोडपले
- ‘पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते’, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
- ‘संजय राऊत बोगस माणूस, त्याचा जिथे दिसेल तिथे ‘करेक्ट’ कार्यक्रम करूत’, निलेश राणेंचा इशारा


