🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ;ॅडलेड येथे गुलाबी चेंडूच्या प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजाची अवस्था खराब झाली आहे. कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही, त्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा असणार आहे.
ऐडिलेड येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ जणांची निवड करताना विराट कोहली आणि संघ व्यवस्थपणाची कसोटी लागणार आहे. ऋषभ पंत आणि साहा आ दोघांचीही अंतिम ११ मधील दावेदारी भक्कम आहे. पण अंतिम ११ मध्ये फक्त एकाच यष्टीरक्षकाची निवड होणार आहे. अशातच माजी खेळाडू आणि समालोचक मांजरेकरांनी साहा आणि पंत यापैकी अंतिम ११ मध्ये कोणाला संधी द्यायला हवी, याबाबत आपलं मतं मांडलं आहे.
संजय मांजरेकर यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात साहाला संधी मिळायला हवी. मांजरेकरांच्या मते निवड करताना खेळाडूच्या यष्टीरक्षकाच्या कौशल्याचाही विचार करण्यात यावा. ट्विटरवर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नचं उत्तर देताना मांजरेकरांनी साहाला पसंती दिली.
ते म्हणाले की, ‘ कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाच्या कौशल्याला प्रथम पसंती द्यायला हवी. जर तुमच्याकडून स्मिथसारख्या फलंदाजाचा झेल सुटला तर तो द्वशतक झळकावून जातो. वेगवान गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियात एक उत्कृष्ट यष्टीरक्षकाची गरज आहे. त्यामुळे माझ्यामते साहाला संधी मिळायला हवी. ‘
In Tests always keeping skills first. Drop a Steve Smith early and he gets a 200! So Saha. Also need a better keeper against pace in Australia. Again Saha. https://t.co/R0udBBCr04
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) December 11, 2020
महत्वाच्या बातम्या
- घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला
- मी प्रश्न सोडवणारच सांगून मुंबईला निघून जायचं ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत – राणे
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- कौतुक तर होणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीने दिसून आला त्यांचा साधेपणा
- …नाहीतर, भारताचा ४-० ने पराभव होईल ; ‘या’ दिग्गज परदेशी खेळाडूनं दिला सल्ला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
