🕒 1 min read
लंडन: भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ;ॅडलेड येथे गुलाबी चेंडूच्या प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजाची अवस्था खराब झाली आहे. कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही, त्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा असणार आहे.
काही दिग्गजांनी ऑस्ट्रेलियात कशी रणनीती असावी याबाबतचे सल्लेही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. मायकल वॉनच्या मते पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यास मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ४-० ने बाजी मारु शकतो. असा अंदाज त्याने व्यक्त केला आहे.
भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक संतुलित आणि मजबूत आहे. स्टिव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघासाठी एक्स फॅक्टर आहे. त्यामुळेच भारतीय संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागू शकतो असं मायकल वॉन म्हणाला आहे. तो क्रिकबजसोबत बोलत होता.
यावेळी तो म्हणाला की, ‘याआधी ऑस्ट्रेलियात भारतीय संघ मजबूत वाटायचा. सध्या संघामध्ये शामी, बुमराह आणि अश्विन यांच्यासारके गोलंदाज आहेत. शिवाय फलंदाजीत पुजारासारखी भिंत आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या संघात आता स्मिथ परतला आहे. स्मिथमुळे ऑस्ट्रेलिया संघ तुल्यबळ वाटतोय. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीही मजबूत आहे.’
गोलंदाजीबाबत बोलताना मायकल वॉन म्हणाला की, भारतीय फलंदाजांना मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्स या त्रिकुटाचा सामना करावा लागणार आहे. अशा वेगवान माऱ्यासमोर कूकाबुरा चेंडूवर डावाची सुरुवात करणं नेहमी आव्हानात्मक राहते. जर नवीन चेंडू व्यवस्थित हाताळला नाही तर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय फलंदाजावर अंकुश ठेवण्यात यशस्वी होतील. पिंक बॉल टेस्टमध्ये अद्याप ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला नाही. जर पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर ऑस्ट्रेलिया ही मालिका ४-० ने जिंकेल.
गळुरु येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केली असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मावर आणि पुजारावर भारतीय संघाच्या फलंदाजी मदार असेल.
महत्वाच्या बातम्या
- घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला
- मी प्रश्न सोडवणारच सांगून मुंबईला निघून जायचं ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत – राणे
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- कौतुक तर होणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीने दिसून आला त्यांचा साधेपणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
