🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न द्व्होकेटआड एडवोकेट सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी पवारांचे निवासस्थान गाठले आहे.
काही आंदोलकांनी बंगल्याच्या आत जाण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नवीन वळण घेणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
या आंदोलनावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला प्रश्न राज्य सरकारने व्यवस्थित हाताळलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. ही गंभीर बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा विषय संबंधित मंत्र्यांनी हाताळणं गरजेचा असल्याचा पंकजा मुंडेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
IPL 2022: चेन्नई संघात मराठी भाषेचा बोलबाला; प्रॅक्टिस सेशन व्हिडीओतील गायकवाड – सोळंकीचे संभाषण व्हायरल!
शरद पवारांच्या निवासस्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; सिल्वर ओकवर फेकल्या चप्पला
शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीच आहे का ? तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र…
IPL 2022: चहलचा आरसीबीच्या खेळाडूंसोबत ‘कोल्ड वॉर’! सामन्यानंतर हातही मिळवला नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
