मुंबई: चेन्नई सुपर संघ जरी दाक्षिणात्य असला तरी संघात इतर प्रांतातील खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यामुळे चेन्नई सोशल मीडियावर पोस्ट करत असलेल्या बऱ्याच व्हिडिओत याचा अंदाज येतो. गेल्या वर्षीपासून चेन्नईच्या सलामीची जान असलेला मराठमोळा ऋतुराज अनेकदा मराठी बोलताना दिसतो. त्याचा पुन्हा एकदा चेन्नईच्या कॅम्पमध्ये मराठीत संभाषण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (CSK) नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रॅक्टिस सेशनचा व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात ऋतुराज (Ruturaj gaikwad) नेट्समध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करतोय. यावेळी त्याने एक शॉट मारला, जो पाहून संघातील युवा खेळाडू प्रशांत सोळंकीने (prashant solanki) त्याला मराठीत ‘शॉट नाय लागला’ असे सांगितले. ज्याला उत्तर देत ऋतुराज ‘ गेला की… वाईडच्या पलीकडे पडलाय’ असे अस्सल मराठी बोलीत व्हिडिओत सांगताना दिसतोय. त्यांच्या या व्हिडीओला चेन्नईच्या मराठी चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मराठमोळ्या खेळाडूंचे खास नाते आहे. याआधीही शार्दूल ठाकूर केदार जाधव सारखे मराठी खेळाडू चेन्नईचा भाग होते. आयपीएल २०२२ बद्दल बोलायचे झाले तर इतर कोणत्याही संघापेक्षा चेन्नई संघात सर्वाधिक मराठमोळे खेळाडू आहेत. ज्यात ऋतुराज गायकवाड , प्रशांत सोळंकी , राजवर्धन हंगरगेकर , तुषार देशपांडे आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. त्यामुळे संघ चेन्नईचा जरी असला तरी त्यात मराठमोळ्या खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या निवासस्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; सिल्वर ओकवर फेकल्या चप्पला
- शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीच आहे का ? तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र…
- IPL 2022: चहलचा आरसीबीच्या खेळाडूंसोबत ‘कोल्ड वॉर’! सामन्यानंतर हातही मिळवला नाही
- IPL 2022: १५व्या हंगामात लखनऊच्या ‘या’ युवा खेळाडुचीच हवा; धोनी स्टाईलने फिनिश तर कोहली स्टाईलने सेलिब्रेशन!
- “राज ठाकरेंना अटक करा”, ‘त्या’ वक्तव्यावरून अबू आझमींची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

