🕒 1 min read
मुंबई: युझवेंद्र चहलने १५व्या हंगामात त्याच्या उत्कृष्ट कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना तो एकामागून एक जबरदस्त कामगिरी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आपल्या गुगली चेंडूंनी प्रभावित केले आणि काही महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या. या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
RR vs RCB सामन्यानंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, युझी (Yuzvendra chahal) आपला माजी सहकारी हर्षल पटेलवर (harshal patel) रागावलेला दिसत आहे आणि नाराजी इतकी दिसून आली की सामना संपल्यानंतर त्याने हर्षलशी हातही मिळवला नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून मैदान सोडले. आपल्या फनी स्टाइलने सगळ्यांना आकर्षित करणारा युझी या व्हिडिओमध्ये खूपच गंभीर दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की युझवेंद्र चहल सामना संपल्यानंतर सर्वांशी हस्तांदोलन करत आहे. पण, हर्षल पटेलला पाहताच तो त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. व्हिडिओमध्ये, हर्षल पटेल देखील चहलला पाहून थांबतो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास पुढे जात नाही. या दोन खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारची दुरावा असली तरी, त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती स्पष्टपणे पुढे आली नाही. आरसीबीने चहलला रिटेन न करणे यामागचे मोठे कारण असू शकते.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: १५व्या हंगामात लखनऊच्या ‘या’ युवा खेळाडुचीच हवा; धोनी स्टाईलने फिनिश तर कोहली स्टाईलने सेलिब्रेशन!
- “राज ठाकरेंना अटक करा”, ‘त्या’ वक्तव्यावरून अबू आझमींची मागणी
- शेतकऱ्यांनो, शेती उपकरणांसाठी घ्या ‘या’ योजनेचा लाभ!
- VIDEO : चहलनंतर उथप्पानेही केला मुंबई इंडियन्सकडून झालेल्या छळाचा खुलासा; म्हणाला “ट्रान्फर पेपरवर सही करण्यासाठी…”
- “मुंह में फुले-शाहू बगल में चावल…”, भातखळकरांनी साधला भुजबळांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
