कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक पंकजा मुंडे समर्थक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त होते. यानंतर काल पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी भाजपला सूचक इशारा दिल्याचे दिसले. ‘कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही,’ असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत.’ असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिले गेले.
राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो,’ असे स्पष्टीकरण यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- किल्ल्यावर अंशुमन मल्होत्राचे मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह फोटो पाहून दुर्गप्रेमी संतापले
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
