Share

झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?

Published On: 

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल सापडला आहे. भोसरी जमीन प्रकरणातला झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे वृत्त काल आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहार प्रकरणात ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी चार दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन राज्य सरकारने झोटिंग समिती नेमली होती आणि त्याचा एक खळबळजनक अहवाल समोर आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या झोटिंग समितीत एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती. एकनाथ खडसेंनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असंही समितीचा अहवाल सांगत आहे.

या समितीचा अहवाल 30 जून 2017 रोजी मुख्य सचिवांना सादर करण्यात आला होता. हा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी खुद्द खडसे यांनी अनेकदा विधानसभेत केली होती, पण हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला नव्हता. आता या अहवालाबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!