Share

लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी घटस्फोटाची  घोषणा केल्यानंतर २४ तासाच्या आत आमिर खान आणि किरण राव हे दोघे पुन्हा एकत्र पाहायला मिळाले होते. हे दोघेजण लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या शूटिंगसाठी एकत्र आले होते. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रीकरसाठी दोघेजण लडाखमधील वाखा गावात होते. त्यानंतर गावकऱ्यांनी आमिर खान आणि त्याच्या संपूर्ण टीमवर  सडकून टीका केली होती.

या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान आमिरच्या टीमने तिथे खूप कचरा पसरवला असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला. आणि त्याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. या व्हिडओमध्ये वाखा गावात खूप कचरा झालेला दिसत आहे. अशी घटना पहिल्यांदा घडली नसून याआधी देखील बॉलीवूडमधील कलाकार चित्रीकरणासाठी जिथे जातात तिथे असाच कचरा करतात त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील शेअर केले जातात. या आरोपानंतर प्रोडक्शन हाऊसने  अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल वरून आपली  प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘AKP (Aamir Khan Production) स्पष्ट करत आहे की, एका कंपनीच्या रुपात आम्ही शुटींगच्या स्थानांना स्वच्छ ठेवण्याचा प्रोटोकॉल पाळतो . आमच्याकडे एक टीम आहे जी ठरवते की शुटींगच्या जागेला कचरा रहीत कसं करायचं. प्रत्येक दिवशी, दिवसाच्या शेवटी संपूर्ण जागेची तपासणी केली जाते.’

पुढे त्यांनी म्हटलं की, ‘संपूर्ण शेड्युलच्या शेवटी आम्ही ठरतो की, जेव्हा आम्ही एखाद स्थान सोडतो ते तितकचं स्वच्छ असलं पाहीजे, जितकं स्वच्छ ते आपल्याला मिळालं होतं. आमच्या शुटींगच्या जागेवर स्वच्छता न ठेवल्याचे आरोप आमच्यावर लावले जात आहेत, आम्ही या गोष्टीचं पूर्णपणे खंडन करत आहोत. आमच्या शुटींगचं मैदान खुलं आहे. आता अधिकारीही याठिकाणी येऊन चौकशी करू शकतात.’ असे म्हणत आपल्यावरील आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!