मुंबई : आर्यलँडच्या दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आर्यलॅंडने दिलेल्या २९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ २४७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह आर्यंलॅंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. आर्यलँडने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत २९० धावांची मजल मारली. आर्यलँडचा कर्णधार अँडी बलबीर्नीने ११७ चेंडुत १० चौकार आणि २ षटकारासंह १०२ धावांची शतकी खेळी केली. हॅरी टेक्टरने ६८ चेंडुत ६ चौकार आणि ४ षटकारासंह ७९ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले फेल्लुक्वायोने सर्वाधीक २ गडी बाद केले.
ICYMI: @cricketireland made history with their first ever ODI win over South Africa courtesy of a brilliant century from captain Andrew Balbirnie ☘️ #IREvSAhttps://t.co/6Yq6ZAWMiK
— ICC (@ICC) July 13, 2021
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला केवळ २४७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह आर्यलँडने पहिला वहिला एकदिवसीय विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेकडुन जानेमन मलनने ९६ चेंडुत ७ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर आर्यलँडकडुन मार्क, एन्डी आणि जोशुआने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. या मालिकेतील पहिला एकदिवसीय पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, गौतम अदानी म्हणाले…
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- स्वबळाचे नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांनी फटकारले, कॉंग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सूचनावजा इशारा


