मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्यक्तव्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याची चर्चा आहे. यामध्ये आणखी भरीसभर ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा पटोले हे लहान माणूस म्हणत त्यांच्यावर बोलणे टाळले. असे असले तरी नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. यावरुन शिवसेनेने सामनातून नाना पटोलेंच्या वक्तव्यांवर भाष्य केले आहे.
नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केल्याचे सामनातून शिवसेने सांगितले आहे
यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझंच मत मांडले. भाजपने देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय, काँग्रेस राज्य आणि देशात लढाई लढत आहे. विरोधक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही आमची लढण्याची भूमिका आहे’, असं नाना पटोले म्हणाले. तर, ‘2024 ला महाराष्ट्रात काँग्रेसच नंबर वन पक्ष असेल, अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली. तसंच महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे’, असं देखील पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! असं आजच्या सामना मधून म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण अफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय
- ‘आदित्यच्या म्हणण्याप्रमाणे रामदास कदम मंत्री असताना गोट्या खेळत होते का ?’
- शरद पवारांच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही लगावला स्वबळाची भाषा करणाऱ्या पटोलेंना टोला
- ‘राजकीय लोकांची नाटकं सुरु मात्र रंगभूमीवरील नाटकांना मनाई’; केदारने साधला राज्य सरकारवर निशाणा


