औरंगाबाद : आज दि. 15 जानेवारी रोजी भाजप नेते धनजंय महाडिक यांचा वाढदिवस. यानिमित्त महाडिकांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विविध क्षेत्रातील मंडळींना अनेक माध्यमांतून त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही सहकारी नेते धनजंय महाडिक यांना सोशल मीडियावरून अभिष्टचिंतन केले. मात्र यावेळी महाडिक यांचा उल्लेख त्यांनी ‘खासदार’ असा केला आहे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1349925784807378945
धनजंय महाडिक हे 2014 साली राष्ट्रवादीकडून कोल्हापूर मतदारसंघातून खासदार झाले होते. पण आजमितीला त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी पंकजा यांनी महाडिक यांचा खासदार असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक खासदार म्हटले की अनावधानाने पंकजा यांच्याकडून चूक घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यामुळे महाडिक समर्थक नक्कीच सुखावले असतील.
महाडिक हे 2019 च्या लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादीकडून पराभूत झाले होत. त्यानंतर त्यांनी अमित शाहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. धनंजय महाडिक सुरुवातीला शिवसेनेत होते. नंतर ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून ते खासदार झाले. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या
…मग तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल
- भाजप आ. अभिमन्यू पवार यांना हायकोर्टाची नोटीस
- ‘मी माघार घेते, जी तुमची इच्छा आहे’ धनंजय मुंडे प्रकरणात महिलेची माघार ?
- मोठी बातमी : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज हॉस्पिटलमध्ये
- औरंगाबादेत पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

