मुंबई : आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती. मात्र, काहीवेळातच ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही झाली. हे वादळ शांत होत नाही तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान,गुरुवारी संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांचा हा पूर्णपणे कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे. राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले आहे. शरद पवारांनी सांगितले आहे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरबीआयच्या निर्णयानंतर आता गुगल प्ले स्टोअरने देखील हटवले लोन देणारे ॲप्स …
- बीडमध्ये डान्स टिचरला ऑनलाईन गंडा
- धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत म्हणाले…
- मेहबूब शेख यांच्याविरोधात तांत्रिक पुरावे नाही
- शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात आज पुन्हा चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पहिली बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

