ऑस्ट्रेलिया : बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आज (15 जानेवारी) सकाळी सुरुवात झाली आहे. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
अनुनभवी गोलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियानं चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला तुल्यबळ टक्कर दिली. डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड यांना माघारी पाठवून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्यातील चुरस कायम राखली. टी नटराजननं सलग दोन धक्के देताना टीम इंडियाला कमबॅक करून दिले आहे. पण, टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. गोलंदाज नवदीप सैनीला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे तो पहिल्याच दिवशी मैदानातून बाहेर गेला आहे. उद्या तो मैदानावर उतरेल की नाही, हे वैद्यकिय अहवाल आल्यानंतर BCCI स्पष्ट करेल.
लाबुशेन ३७ धावांवर असताना नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर अजिंक्यनं झेल टाकला. त्यानंतर ४८ धावांवर असताना चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये लाबुशेनला जीवदान दिलं. अजिंक्यच्या तुलनेत हा झेल थोडा अवघडच होता. स्मिथ बाद झाल्यानंतर लाबुशेननं चौथ्या विकेटसाठी मॅथ्यू वेडसह १७९ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. लाबुशेननं कसोटीतील पाचवे आणि टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक झळकावले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ५ शतकांचा विक्रमही लाबुशेननं नावावर केला. टी नटराजननं या दोघांनाही माघारी पाठवलं. लाबुशेन २०४ चेंडूंत ९ चौकारांसह १०८ धावांवर, तर वेड ४५ धावांवर बाद झाले.
UPDATE – Navdeep Saini has now gone for scans.#AUSvIND https://t.co/pN01PVnFfx
— BCCI (@BCCI) January 15, 2021
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे


