Share

भाजप आ. अभिमन्यू पवार यांना हायकोर्टाची नोटीस

Published On: 

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे औसा (जि. लातूर) मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यांच्या निवडीस प्रतिस्पर्धी उमेदवाराने निवडणूक याचिकेद्वारे औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकेवर आठ आठवड्यानंतर पुढील सुनावणी होईल.

२०१९ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांनी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. पराभूत उमेदवार बजरंग जाधव यांनी त्यांच्या निवडीला आक्षेप घेत ॲड. प्रल्हाद बचाटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

आ. पवार यांनी नामनिर्देशन पत्रात विस्तृत माहिती सादर केलेली नाही. त्यांच्या व्यवसायासंबंधीचा उल्लेख केलेला नाही असे याचिकेत म्हटले आहे. ॲड. बचाटे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आणि निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वानुसार याचिकेत नमूद करण्यात आलेली माहिती विस्तृतपणे देणे बंधनकारक असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. आ. पवार यांची निवड रद्द करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्या. व्ही. के. जाधव यांनी पराभूत सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!