औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील ८ आणि शहरातील ५ बूथवर लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. प्रत्येक बूथवर १०० याप्रमाणे या १३ बूथवर पहिल्या दिवशी १३०० कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी शासकीय व खासगी डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील १३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. ग्रामीण भागात दौलताबाद, गणोरी, पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड, कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय अशा ८ ठिकाणी पहिल्या दिवशी लसीकरणाला प्रारंभ होईल.
पहिल्या दिवशी जिल्ह्यात १८ बूथवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु ही संख्या आता १३ करण्यात आली. एका बूथवर एका दिवशी १०० जणांना लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीनंतर बूथची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागांत १५० बूथ कार्यान्वित करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

