Share

ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन, पंकजा मुंडेंची घोषणा

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळात भाजप नेते प्रत्येक भागात जाऊन चर्चा करतील. येत्या 26 जूनला चक्काजाम आंदोलन करु. आम्ही न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!