Share

हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांकडे मागितली किडनी विकण्याची परवानगी !

Published On: 

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारने दखल घेतली नसल्याने पाच शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किडनी विकण्याची मागणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन पाठवण्यात आले आहे.

मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांवर पंचवीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असल्याने बँक पुनर्गठन करत नाहीत… त्यामुळे पिक कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही, अशा परिस्थिती मध्ये सरकारने पुनर्गठन करण्यासंदर्भात बँकांना आदेश द्यावेत अन्यथा या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाच शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मात्र, यासंदर्भात राज्य सरकारकडून किंवा अधिकाऱ्यांकडून कुठलीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर या शेतकऱ्यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे, या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!