Share

‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली’, करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंनी मौन सोडले

Published On: 

बीड : परळीचे नाव राज्यात नव्हे तर देशभरात नावलौकिक आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी शहरात आहे. यामुळे देश-विदेशातील भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन यांनी परळीचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजवले. एक वेळ तर अशी होती की, राज्याचे महत्त्वाचे निर्णय परळीतून घेतले जात.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीचे नाव चर्चेत ठेवले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी. या भावडांनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपामधून परळीला कायम मध्यवर्ती ठेवण्याचे काम केले. परळीचा जिल्हा हा बीड असला तरी आजही भाजप आणि राष्ट्रवादीचे महत्त्वपूर्ण निर्णय परळीतूनच घेतले जातात हे सर्वश्रूत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करुणा शर्मा यांच्यामुळे परळीचे नाव वेगळ्याच कारणात चर्चेत येत आहे.

करुणा शर्मा यांच्या बहिणीने धनंजय मुंडेंवर केलेल्या खोट्या आरोपामुळे तर महाराष्ट्र हादरला होता. करुणा आणि धनंजय मुंडे यांचे लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्या महिलेने आरोप केल्याने संताप निर्माण झाला होता. त्यानंतर अनेक महिन्यांनी करुणा यांनी न्याय मागण्यासाठी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असे जाहीर केले होते. मात्र, त्या परळीत आल्यावर वेगळाच राडा झाला. सध्या करुणा एट्रॉसिटी प्रकरणात १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत आहेत. आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर एक चका्र शब्दही काढला नाहीये. परंतू त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी मौन सोडल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंकजा यांनी दोन दिवसांपासून परळीत असलेल्या घडामोडींवर अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याचे दिसत आहे. ‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे’ असे त्या म्हणाल्यात.

पंकजा यांनी ट्विट केले आहे की, ‘अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. wrong president should not be set!ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची!’ या शब्दांत सूचक भाष्य त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!