मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. आवश्यकता असल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असे ईडी सूत्रांकडून सांगण्यात आले.
या चौकशी दरम्यान, ईडीने त्यांच्या मोबाईलची देखील छाननी केली आहे. यामुळे यामधून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. अनेक तास चौकशी सुरु असल्यामुळे आजच खरमाटेंना अटक करण्यात येतेय की काय अशी शक्यता होती. मात्र त्यांना कार्यालयातून सोडण्यात आलं आहे. बजरंग खरमाटे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात येत असून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, यापूर्वी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत खरमाटेसह परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे.खरमाटे हे अनिल परब यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे अनिल परब यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

