मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लीम यांचे पूर्वज एकच आहेत. मात्र ब्रिटीशांनी आपआपसात गैरसमज निर्माण केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी मुंबईत आयोजित ‘राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी’ या कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. ब्रिटीशांनी ‘भारतात हिंदूंसोबत राहिला तर काहीच मिळणार नाही. उलट हिंदूंची निवड केली जाणार तर मुस्लिमांचा धर्म संपुष्टात येईल’ असा गैरसमज ब्रिटीशांनी भारतीयांमध्ये निर्माण केला. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी बजरंग दल तसेच संघाचे विचार तालिबान समान असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून सर्व स्तरातून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मोहन भागवत यांनी आता नवीन वक्तव्य करत आपण अगोदर भारतीय असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

