मुंबई: कोरोना संक्रमण अजूनही थांबलेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमी राज्यातील नागरिकांना सतर्क करण्याचे कार्य केले आहे. मात्र त्यांच्या याच भूमिकेमुळे त्यांच्यावर सतत टीकादेखील केली जात आहे. कोरोनामुळे सर्व सण-उत्सव यांवर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र मनसेने सर्व नियम झुगारत दहीहंडी, बैलपोळा उत्सव साजरा केला. यावरच मुख्यमंत्र्यांनी नाराजगी व्यक्त करत सर्व राजकीय पक्षांना खडसावले आहे.
‘महाराष्ट्रात कोरोनाचा एवढा स्तोम माजवला जातोय की, यापुढे कोरोना हा चायनीज व्हायरस ऐवजी ‘महाराष्ट्र सरकार व्हायरस’ म्हणून जगात ओळखला जाईल.’ अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केली आहे. तसेच सरकारनी कोरोना संबधित सर्व डेटा जनते बरोबर पारदर्शक पणे शेअर केला पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
महाराष्ट्रात करोना च एव्हढं स्तोम माजवल जातंय की यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारनी करोना संबधित सर्व डेटा जनते बरोबर पारदर्शक पणे शेअर केला पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 7, 2021
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या कोरोना बाबतच्या भूमिकेवर नाराजगी जाहीर करत राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा सर्व बंद करण्याची परीस्ठीती येऊ देऊ नका, कारण तिसरी लाट येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच राज्य सरकारची सर्व धोरणे महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच आहे. त्यामुळे सर्वांनी संयम पाळणे गरजेचे आहे. असे आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना तसेच सर्व राजकीय पक्षांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा


