Share

त्याला का संधी दिली नाही?, विराटचं उत्तर ऐकून अश्विनसह अनेकांना बसेल धक्का

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा 157 धावांच्या फरकाने पराभव केला. भारताने इंग्लंडकडून लीड्स कसोटीचा बदला घेतला आणि या सामन्यातील विजयासह इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी घेतली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 368 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण हा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि दुसऱ्या डावात 210 धावांवर संघ सर्वबाद झाला. आणि हा सामना भारताने आपल्या खिशात घातला.

दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड न झाल्याने खूप चर्चा झाली होती. चौथ्या डावात फिरकीपटूंना मदत करेल, असं म्हटलं जात होतं. अशा परिस्थितीत अश्विनच्या नसल्याने भारतीय संघाला तोटा सहन करावा लागू शकतो, असही म्हंटल जात होत. तसेच अश्विनला न खेळविण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी आश्चर्य तसेच नाराजीही व्यक्त केली होती.

पण भारताने अश्विनशिवाय सहजतेने चौथी कसोटी जिंकली. हा सामना जिंकल्यानंतर मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीला अश्विनला न खेळविण्याच्या निर्णयावर विचारणा झाली. या प्रश्नावर विराटने जे उत्तर दिलं, त्यामुळे अश्विनसह क्रीडारसिकांना धक्का बसू शकतो. संघ एकजुटीने निर्णय घेतो. बाहेर काय चर्चा होते याची आम्हाला पर्वा नाही, असं काहीस विराटने उत्तर विराटने दिल.

सामन्यानंतर जेव्हा विराट कोहलीला रविचंद्रन अश्विनबाबत विचारलं गेलं तेव्हा विराटने अगदी शांतपणे उत्तर दिलं. ‘आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता हे सांगताना त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘आम्ही कधीही विश्लेषण, आकडेवारी किंवा आकड्यांकडे बघत नाही. कुठं लक्ष केंद्रित करायचं हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही एक संघ म्हणून सामूहिक निर्णय घेतो. बाहेरच्या चर्चांवर आम्ही निर्णय घेत नाही’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!