🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. ‘चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो’ अशी खोचक टीका त्यांनी केली होती. यावरूनच चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक वार सुरु आहेत. दरम्यान शेख यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचले आहे.
‘माझा मुलगा पण असल्या खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळत असतो.’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे. यामध्ये मेहबूब शेख यांचा मुलगा लहान मुलांची खेळणी म्हणून नकली वाघसोबत खेळतानाचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. यातूनच शेख यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना खोचक टोला लगावला आहे.
https://www.facebook.com/1268270766592877/posts/4358766194209970/?d=n
दरम्यान याअगोदर भाजपच्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना सडेतोड उत्तर दिली होते. वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकताहेत.कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले.आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. पण मी काय आहे; काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. असा दम भरवत मी वाघ आहे लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. असा इशारा त्यांनी ट्वीट करत दिला होता. आता त्या मेहबूब शेख यांना काय प्रतिउत्तर देतात यावर लक्ष लागून राहिले आहे. यांच्या वक्तव्यांमुळे आता भाजप- राष्ट्रवादी वाद निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
