मुंबई : लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अजूनही आर्थिक चक्र बिघडलेले असताना कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांचे देखील नुकसान झाले असून यात असंघटित कामगारांना मोठा फटका बसला आहे. अशाच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करत ऊसतोड कामगारांच्या व्यथांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. ” ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही!!! करार 3 वर्षाचाच होईल .. कोरोनाच्या धरतीवर मजुरांना विमा कवच द्या सरकारने व कारखान्याने ही जवाबदारी घ्यावी..सरकार पातळीवरील विषय चर्चा करण्यासाठी एक आणि भाववाढ व कोरोना सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अश्या दोन कमिटी साखर संघाने कराव्या, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी त्या कॉमिटींचे अध्यक्ष असावे. या दोन्ही या कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी.” असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकार पातळीवरील विषय चर्चा करण्यासाठी एक आणि भाववाढ व #COVID19 सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अश्या दोन कमिटी साखर संघाने कराव्या, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर जी यांनी त्या कॉमिटींचे अध्यक्ष असावे. या दोन्ही या कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी.
(२/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
यासोबतच, ” ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडेना ही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आणखी मंत्री उदा.आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला व बाल कल्याण यांना ही बोलवावे..लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे.. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही… माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत..”असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
आणि कमिटीच्या सूचना लवादासमोर आणाव्या निर्णय लवादाने घ्यावे अश्या सूचना साखरसंघाच्या बैठकीत मी केल्या.
(२/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला कदापिही माफ करणार नाही- स्नेहलता कोल्हे
- ‘या’ शहराच्या मनपातील आरोग्य समितीच्या सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना
- भिवंडीतील इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर
- माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभर राबवा- बाळासाहेब थोरात
- …अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ : आ. गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

