Share

…अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ : आ. गोपीचंद पडळकर

Published On: 

सांगली : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यामुळं राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यास नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या डोके दुखीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून एसटीचे दाखले तात्काळ द्यावेत. जे आदीवासी समाजाला तेच धनगर समाजाला मिळावे अन्यथा राज्य सरकार विरुध्द धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा स्पष्ट इशारा धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आमदार पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील धनगड आणि धनगर एकच आहेत, असा अध्यादेश काढावा. सर्व धनगर समाजाला एसटी चे दाखले ध्यावेत. 2019-20 या वर्षासाठी 1000 कोटी व तेथून पुढे प्रत्येक वर्षी जे आदिवासींना तेच धनगरांना हे ठरल्याप्रमाणे 2020-21 या वर्षात आदिवासींना 8853 कोटी मंजूर करण्यात आले आहेत . तितकाच निधी धनगर समाजाला द्यावा. 7 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या धर्तीवर 1000 कोटींची तरतूद केली.

त्यातून धनगर समाजाला अनेक योजनांची भेट दिली. 2019-20 वर्षासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले. परंतु आपल्या सरकारने आतापर्यंत एक पैसा ही खर्च केला नाही. उलट चांगल्या योजना बंद केल्या. धनगर आरक्षण या विषयावर एकही बैठक सरकारने घेतली नसल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात केला आहे.

कोरोनास्थितीमुळे धनगर समाज शांत आहे, पण तो झोपला नाही. हक्कासाठी धनगर समाज पुन्हा तीव्र संघर्ष करणार आहे. एसटी आरक्षणासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ आहे, असा तीव्र इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!