अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या अभियानाची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
ना.थोरात म्हणाले की, कोरोना हे मानवतेवर आलेले संकट आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान शहरभर राबवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जात जनजागृती करावी. हे अभियान राबविण्यासाठी शहर काँग्रेसने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या मोहीमेमुळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोना आजारापासून आपणास वाचवता येईल. असे ना.थोरात म्हणाले.
अहमदनगर शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली. यावेळी आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, आ.सुभाष झांबड, नगर तालुकाध्यक्ष संपत मस्के, दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘शरद पवारांचा गेम अजित पवारांनीच केला!’
- भिवंडीतील इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर
- राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला कदापिही माफ करणार नाही- स्नेहलता कोल्हे
- ‘या’ शहराच्या मनपातील आरोग्य समितीच्या सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना
- भिवंडीतील इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर


